Skip to product information
1 of 1

Tumchyamadhil Neta by h.v. Bhave

Tumchyamadhil Neta by h.v. Bhave

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
सर्वांना वाटते की नेता हा फक्त राजकीय क्षेत्रात असतो आपल्या देशाची लोकसंख्या आता 140 कोटीच्या वर आहे जेथे नेतृत्व - गुणांची जरुर असते अशी शेकडो नव्हे तर हजारो क्षेत्रे आता मानवी समाज - व्यवहारात निर्माण झाली आहेत. लहानशा खेडेगावातील ग्रामपंचायतीसाठी नेता लागतो तर टक मालकांच्या संघटनेलाही नेत्याचीच आवश्यकता असते. अशा प्रकारे देशाला हजारो नेत्यांची जरुर असते. हे नेते सर्वसामान्य माणसातूनच निर्माण होत असतात. नेत्याचे गुण सामान्य माणसातसुद्धा असतात पण तो आवश्यक त्या गुणांचा विकास करीत नाही, हीच खरी अडचण आहे. नेता होण्यास आवश्यक गुण जवळजवळ प्रत्येक माणसात असतात. अगदी तुमच्यातही ते आहेत. त्या साठी काय करावे लागेल हेच येथे सांगितले आहे.
ज्याला नेता व्हायचे असेल त्याने आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला पाहिजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही तरी समस्या असतात. आपल्या मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या जीवनात कोणत्या समस्या आहेत हे नेता होऊ इच्छिणाऱ्याने समजून घेतले पाहिजे व त्यांच्याशी समरस व्हायला हवे. या जगात प्रत्येकालाच आपले प्रतिपादन इतरांना ऐकवण्याची इच्छा असते. म्हणूनच नेत्याने इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायला हवे. आपल्या सहका‌‌ऱ्यांना योग्य तो मान दिला पाहिजे कारण लोक सन्मानाचे आणि पारितोषिकाचे भुकेले असतात.
नेता होणारा शेवटी मनुष्यच असतो. त्याच्याही चुका होतात. पण कोणत्याही चुका दुरुस्त करता येतात. नेत्याचे वर्तन सर्वांसमोर घडत असते. अनेक अनुयायी त्याच्यावर टीका करतात व तक्रारही करतात. आपल्या चुका, तक्रारी व टीका याला नेत्याने यशस्वीपणे तोंड द्यायला हवे. नेत्यासमोर उदात्त असे ध्येय असले पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकड़े पुरेसा उत्साह हवा. नेत्याचे ध्येय-धोरण नेहेमी रचनात्मक हवे. त्याचे ध्येय नकारात्मक असता कामा नये. त्याच्याकडे मनाचा समतोलपणा हवा. त्यासाठी त्याने चिंता सोडली पाहिजे.
अशा प्रकारे जो माणूस विविध गुणांची जोपसना करेल आणि भविष्यकाळात काय घडणार आहे. याचा ज्याला अचूक अंदाज असेल. तो सामान्य बुद्धीचा असला तरी नेता बनू शकेल.
Similar Products
View full details