Tyagmurti Mata Ramai By Vijay Shivram Gavare त्यागमूर्ती माता रमाई
Tyagmurti Mata Ramai By Vijay Shivram Gavare त्यागमूर्ती माता रमाई
Couldn't load pickup availability
त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?
दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती.
कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई - बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.
Tyagmurti Mata Ramai | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | Biography Book In Marathi | Ramabai Bhimrav Ambedkar Books | रमाबाई रमा बाई चरित्र मराठी पुस्तक पुस्तके पुस्तकं पुस्तकें बुक बुक्स | Inspirational Autobiography of Dr. Babasaheb Ambedkar, Motivational on Books, dr, Charitra Aatmacharitra Atmacharitra | डा बाबा साहेब, डॉ भीमराव आंबेडकर, आंबेडकर | Majhi Atmakatha माझी आत्मकथा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर, Mazi Atmakatha, Kadambari Yashwant br Bhimrao b r Pride Baba Saheb Bheemrao Bheem Rao Bhim डॉ. बाबासाहेब आंबेडकर डा बाबा साहेब, डॉ भीमराव आंबेडकर
Share
