THE FIFTH AGREEMENT BY Don Miguel Ruiz द फिफ्थ अग्रिमेंटडॉन मिग्युअल रुईझ
THE FIFTH AGREEMENT BY Don Miguel Ruiz द फिफ्थ अग्रिमेंटडॉन मिग्युअल रुईझ
”डॉन मिग्युअल रुईझ याने ‘द फोर अॅग्रिमेंटस्’ या पुस्तकात, आपली शिकण्याची प्रक्रिया किंवा संस्कार प्रक्रिया आपल्याला उपजत असलेला सुज्ञपणा कशा प्रकारे विसरायला भाग पाडते.. याच उलगडा केला आहे. आयुष्यभर आपण अशा अनेक करारांना संमती देतो जे आपल्यासाठी हानीकारक असतात व आपल्याला अनावश्यक यातना देतात. असे ‘‘स्व’’ला मर्यादित करणारे करार मोडून त्याऐवजी…… आनंद, प्रेम व मुक्तता मिळवून देणारे करार करण्यासाठी ‘द फोर अॅग्रिमेंटस्’ आपल्याला साहाय्य करतं.
आता डॉन मिग्युअल रुईझ व त्याचा मुलगा डॉन जोझ रुईझ यांनी एकत्र येऊन ‘द फोर अॅग्रिमेंटस्’वर नव्याने प्रकाश टाकला आहे आणि आपल्या जीवनाचं वैयक्तिक स्वर्गामध्ये परिवर्तन करण्यासाठी एक अत्यंत सामर्थ्यशाली नवीन करार ः पाचवा करार आपल्याला बहाल केला आहे. ‘द फिफ्थ अॅग्रिमेंट’ आपल्याला ‘स्व’ सामर्थ्याच्या जाणिवेच्या अजून खोल पातळीवर घेऊन जातं आणि जन्माच्या वेळी आपल्यामध्ये असलेल्या निर्मळ निरागसतेप्रत पुन्हा घेऊन जातं.
ज्या पुस्तकाने जगभरातील लाखो व्यक्तींची आयुष्यं बदलून टाकली, त्याचा उत्कंठावर्धक पुढील भाग आपल्याला आठवण करून देतो, की आपण स्वतःला कोणती विलक्षण भेटवस्तू देऊ शकतो ः आपण खरेखुरे जसे आहोत तसे असण्यातील मुक्तता.
“