Your cart is empty now.
जीवनाची नवी पहाट कशी असेल
आयुष्यात कित्येकदा स्वतःला सावरावे लागते. दुःख, तणाव, संकटे यांमुळे आपण मोडून पडतो. असे वाटते, की पुन्हा कधी आपल्या आयुष्यात उजाडणारच नाही. परंतु असं नाही. पुन्हा एकदा सकाळ होते.
आपल्यामध्ये ताजेपणा, नावीन्य, जुन्या गोष्टींपासून सुटका यांची भावना जागृत होते व आपण पुन्हा स्वतःला सावरून ठामपणे उभे राहतो.
थोडा विचार करा… ही नवीन पहाट अंधारानंतरच का यायला हवी? अंधार होण्याआधीच उजाडले तर! का नाही? जर या काळोख्या रात्रीवर मनन झाले तर ती अंधारी रात्र आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाईल.
प्रत्येकाने आपल्या अंधार्या गोष्टींवर म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी, वाईट भावना, जुन्या वृत्ती यांवर काम करायला हवे. यावर कसे काम करायचे याचे मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे प्राप्त होईल.
या पुस्तकात वाचाः
उत्कृष्ट भविष्य कसे घडवाल?
‘चांगले वाटण्याचे’ गुपित काय?
नियतीला कोणते भावबीज द्यावे?
संघर्षयुक्त जीवनातून मुक्ती कशी प्राप्त करावी?
आपला निरागसपणा कसा जोपासावा?
प्रतिस्पर्धेच्या भावनेमुळे होणार नुकसान कसे टाळता येईल?
आदररूपी अहंकार कसा नष्ट होईल?
स्वतःला मदत कशी करावी?
Added to cart successfully!