Your cart is empty now.
सृष्टीविषयी माणसाला अनादी काळापासून गूढ वाटत आले आहे. स्वतःचे अस्तित्व आणि त्याचे प्रयोजन याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न तो अथकपणे करत आहे. विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून त्याचा हा प्रवास चालूच आहे. या प्रवासात माणसासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या मार्गावरील प्रश्न तर कधीकधी फारच जटील असतात. अशा सर्व प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा वेध या पुस्तकात घेतला आहे.
‘माणूस खरेच माकडापासून तयार झाला का? आपल्यात सकारात्मक बदल कसे करावेत? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? मानवी आयुष्याचे रहस्य काय?’ यांसारख्या प्रश्नांपासून ते ‘पैशांचे आयुष्यात स्थान काय? शनीवर तेल कशासाठी ओततात? करणी-भानामती खरेच असते काय? व्यापारात बेइमानी करावी लागली तर काय?’ यासारख्या सर्वसामान्यांना पडणार्या असंख्य प्रश्नांना साक्षात ‘सरश्रीं’नी दिलेली उत्तरे या पुस्तकात आहेत.
अनेक गैरसमज समूळ नष्ट करून समृद्ध जीवनाकडे वाटचाल करायला शिकवणारे पुस्तक…
Added to cart successfully!