Skip to product information
1 of 1

Ushta उष्टं by Omprakash Valmiki ओमप्रकाश वाल्मिकी मंगेश बनसोड

Ushta उष्टं by Omprakash Valmiki ओमप्रकाश वाल्मिकी मंगेश बनसोड

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Ushta उष्टं by Omprakash Valmiki ओमप्रकाश वाल्मिकी  मंगेश बनसोड

माणसाचे जेव्हढे शोषण जाती-धर्मांच्या भंकस नावाखाली सर्वश्रेष्ठ वगैरे संस्कृती असलेल्या आपल्या देशात करण्यात आले, तेवढे जगात कुठेही झाले नाही. स्वतःच्याच तोंडाने स्वःतला उच्च वगैरे म्हणवून घेणाऱ्या तथाकथितांनी निसर्गाने दिलेले मुबलक पाणीही आपल्या मर्जीने, तहानलेल्यांना विहिरीवर तासन्तास ताटकळत उभे ठेवून, मजलुमांच्या जीवाचा शेवट पाहिला. साक्षात माणसामाणसांत भेद करून सनातनी सडलेल्या मनोवृत्तीची ही विष्ठा पिढ्यान् पिढ्या डोक्यावर वाहून नेण्यास ज्यांना बाध्य केले गेले, त्या बांधवांचे हे शिलालेखीय दगडी वास्तव ओमप्रकाश वाल्मिकीजींनी आपल्या ‘जूठन’ या स्वकथनातून शब्दबद्ध केले आहे.
कोणताही संवेदनशील माणूस शरमेने आपली मान खाली घालेल असले लाजिरवाणे जिणे दुसऱ्याला जगण्यास भाग पाडणारे लोक किती खालच्या पातळीवरचे तकलादू आहेत, याचा प्रत्यय आपणाला तेव्हा येतो, जेव्हा हे महाशय डुकराचे मटण खायला मजलुमांच्या वस्तीत आपलं ‘सर्वश्रेष्ठ’ तोंड लपवत जातात आणि नेहमीच कोवळ्या डुकराच्या पिलांची मागणी करतात.
तथाकथितांनी आपल्या अस्तित्वासाठी साध्याभोळ्या लोकांची जी गुलाम मानसिकता तयार केली, ‘जूठन’ हा त्याचा आरसा आहे, जो आपलाच विद्रूप चेहरा आपणाला स्पष्ट दाखवितो.
डॉ. मंगेश बनसोड यांनी भारतीय साहित्याबरोबरच जगभर गाजलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या स्वकथनाचा मराठीत अनुवाद करून एकूण दलित आत्मकथनांच्या कक्षा रुंदावल्या व त्याचबरोबर समग्र मानवी दुःख एकच असल्याचा चिरंतन विचार अधिक जोरकसपणे या स्वकथनाच्या रूपाने अधोरेखित केलाय.
– लोकनाथ यशवंत

View full details