Vasunaka by Bhau Padhye वासूनाका भाऊ पाध्ये
Vasunaka by Bhau Padhye वासूनाका भाऊ पाध्ये
Couldn't load pickup availability
Vasunaka by Bhau Padhye
"वासूनाका हे एक challenging स्वरूपाचे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या गोष्टींचा निवेदक 'पोक्या' हा एक मॅट्रिकपर्यंत शिकलेला पण वासूनाक्याचाच मेंबर आहे. पोक्याचा संवेदन-स्वभाव (sensibility) हे वासूनाक्यातल्या प्रत्येक अनुभवाचे खरे माध्यम... अर्थातच पुस्तकातली भाषा, शैली आणि नैतिक मूल्येसुद्धा पोक्याचीच.
अत्र्यांसारखे टीकाकार भाऊ पाध्येंनाच पोक्या समजून त्यांच्यावर तुटून पडले, कारण अशा पातळीवरच्या व्यक्तीने वाङ्मयीन, निवेदन करायला धजणे म्हणजे सांस्कृतिक वर्णव्यवस्थेविरूद्ध बंड करण्यासारखेच आहे!”
– दिलीप चित्रे (दीपावली. जानेवारी १९६७)
“ठिकठिकाणी थोड्याफार फरकाने असले वासूनाके आज अस्तित्वात आहेत.... आणि त्यांचे कमालीचे स्पष्ट, निरर्गल, उबगवाणे तरीही हृद्य दर्शन भाऊ पाध्यांनी घडवले आहे.”
– विजय तेंडुलकर (महाराष्ट्र टाइम्स, ३ मार्च १९६६)
"आजवर मराठीतील अनेक लेखक-लेखिकंनी स्त्रीचे दुःख सांगितले आहे. परंतु बकाल जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या आपदा एकवटीने सांगणारे वासूनाका हे बहुधा पहिलेच पुस्तक.”
– वसंत शिरवाडकर (वीणा, एप्रिल १९६६)
"भोग ही यांची गर्ता आहे. तिथे आनंद नाही, प्रेम नाही, शांती नाही. पण या टग्यांच्या रितेपणात जो हिरवा तळ आहे, त्याच्यातून एक गंधर्वसृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे.”
- दुर्गा भागवत (अभिरूची, मार्च १९६६)
"भंकसपणा च्या दिशाशून्य जीवनाच्या वास्तवाचे निर्भय चित्रण."
- दि. के. बेडेकर (पहिल्या आवृत्तीचा ब्लर्ब).
Share
