'वेड्यांची शर्यत'
जगण्याला जसं एक कारण लागतं तसं धावण्यालाही एक कारण, एक मार्ग लागतो. स्वतःतूनच तयार झालेला एक रस्ता लागतो. एक आकृती आणि एक आशय सुद्धा लागतो. यांपैकी काहीच नसलं तर नुसतं धावणं, धावत सुटणं निरर्थक ठरतं. अशा धावण्यात चिक्कार फिरल्यासारखी धावणाऱ्याची भ्रामक समजूत होत असली तरी भ्रमाचा भोपळा फुटल्यावर मात्र कारणाशिवाय धावणं वाया गेलं असं वाटायला लागतं.
उत्तम कांबळे या विचारवंत लेखकानं 'वेड्यांची शर्यत' या पुस्तकात अशाच निरर्थक धावणाऱ्यांच्या या वेडाबद्दल लिहिलं आहे. 'अभियंत्यांचा महापूर,' ' सिग्नलवरचा भारत,'
' मळ्याकडे धावताहेत गावं,'
' पैसा फेको, देव देखो,' व 'फलकावरचे समाजरक्षक' अशा लेखांमधून समाजाचा भ्रमाचा भोपळा फोडायचा प्रयत्न केला आहे.