Your cart is empty now.
'व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षित भारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्या समाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजे मानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखाली वावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पना येते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्या चरित्रलेखनातून होते. या पुस्तकावर आधारलेला एक धडा पाठयपुस्तकात असावा म्हणजे नव्या पिढीला व्यंकटेश बापूजी केतकर हे कोण होते, याची कल्पना येईल. -जयंत नारळीकर
Added to cart successfully!