Your cart is empty now.
धावपळीच्या जीवनाशी परमात्म्याचा शोध घेण्याशी कोणताही विरोधनाही. खरं म्हणजे धावपळीच्या जीवनात परमात्म्यासाठी वेगळा वेळकाढण्याची काही गरजच नाही. तुमच्या धावपळीच्या जीवनात,सगळं काही करण्यात – मग तुम्ही दगड फोडत असाल, घर बांधतअसाल, फॅक्ट्री, कारखाना चालवत असाल, घरी स्वयंपाक करतअसाल, कपडे शिवत असाल, वीणा वाजवत असाल, चित्र काढतअसाल- काहीही करा – त्या करण्याने परमात्म्याचा शोध घ्यायलाविरोध होत नसतो. कारण परमात्म्याचा शोध घेणं म्हणजे वेगळंकाही करायचं नसतं. ती एक नवीन अॅक्शन नसते. परमात्म्याचाशोध एक कॉन्शसनेस आहे, एक चेतना आहे, अॅक्ट नाही, डुईंगनाही.– ओशो
Added to cart successfully!