Yadurana - यदुराणा
Yadurana - यदुराणा
भगवान श्रीकॄष्ण हे भारतीय इतिहासातील आकर्षक पर्व आहे. देवकीचा पुत्र, यशोदेचा कान्हा, सुदामाचा मित्र, नराधमांचा कर्दळकाळ, पांडवांचा हितकर्ता, अर्जुनाचा सारथी, भगवानगीतेचा उदगाता, व्दारकेचा राजा अशी त्याची विविध रूपे लहान थोरांना पिढयानपिढया भावली आहेत. त्यामुळे या महापुरूषाच्या जीवनाचा विविधांगी अभ्यास महाभारत काळापासून आजपर्यंत होत आहे. भगवान श्रीकॄष्णावर विविध भाषेतून शेकडो ग्रंथ लिहिले गेले आहेत पण तरीही अनेक ग्रंथलेखकांचा भगवान श्रीकॄष्ण हा आजही जिव्हाळयाचा लेखक विषय आहे. सिद्धहस्त लेखिका लीला गोळे यांनी त्यांच्या ’यदुराणा’ कादंबरीतून भगवान श्रीकॄष्णाच्या जीवनाचा भावोत्कट वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या ’यदुराणाचा’ वाचक उत्स्फुर्तपणे स्विकार करतील याची खात्री आहे. स्नेहल परंपरेतील ही भावपूर्ण स्नेहांजुली खास रसिक वाचकांसाठी!