Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

सकारात्मकतेकडून उत्कृष्टतेकडे : वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील यशाचा मार्गदर्शक   by   Jyprakasha Zede
Rs. 135.00Rs. 150.00

तीन माणसं दगड फोडण्याचं काम करत होती. जवळूनच जाणार्या एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना विचारलं, ‘‘आपण काय करत आहात?’’ पहिला म्हणाला, ‘‘मी दगड फोडतोय.’’ दुसरा म्हणाला, ‘‘कुटुंबाच्या चरितार्थासाठी मी दगड फोडतोय आहे.’’ तिसरा म्हणाला, ‘‘इथे होणार्या देवाच्या मंदिरासाठी मी दगड फोडतोय.’’

या तीनही माणसांचं काम एकच, त्या कामासाठी त्यांना मिळणारा मोबदला एकच; पण या कामात असणारी त्यांची गुंतवणूक मात्र वेगवेगळी. पहिल्या माणसाचे फक्त हातच कामात गुंतले होते. दुसरा माणूस हाताने तर काम करतच होता; पण तो डोक्याचाही वापर करत होता. मात्र तिसर्याक माणसाची कामात संपूर्ण गुंतवणूक होती. त्यामुळे उत्कृष्टता निर्माण होते. म्हणजे तो हाताने काम करत होता, त्याच्या डोक्यात विचार होते आणि त्याच्या कामात हृदयाची म्हणजे भावनांची गुंतवणूकही होती.

या वेगवेगळ्या गुंतवणुकींमुळे कामाच्या दर्जात फरक पडतो. तिसर्याा माणसाच्या हातून होणारं काम म्हणजेच उत्कृष्टता! ते काम करणार्याभ माणसाची वैशिष्टयं त्याच्या कामातून साकार होत असतात; प्रकट होत असतात. काम करणार्या‍च्या कामाचा ठसाच त्या-त्या कामावर उमटत असतो; मग ते काम कोणतंही असो! अतिशय तन्मयतेने केलेलं काम उत्कृष्टतेचीच कास धरू पाहतं. स्वतःच्या कामात प्रत्येक वेळी थोडीथोडी सुधारणा करत शेवटी अचूकतेकडे, पूर्णत्वाकडे वाटचाल करत राहणे म्हणजे उत्कृष्टता!

Categories:
Translation missing: en.general.search.loading