युरोपातल्या लिथुएनिया या देशात चिऊने सुगिहारा नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने एक मानवतेची संवेदनशील लढाई एकट्याने लढली, त्याबद्दलचं हे पुस्तक!
पोलंडमधले ज्यू लोक नाझींच्या अत्याचारामुळे आपला देश सोडून पलायन करत होते. दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी त्यांना सुगिहारा यांच्याकडून व्हिसा हवा होता. पण जपान सरकारने सुगिहारांना या शरणार्थींना व्हिसा देण्यास नकार कळवला. आपल्या वरिष्ठांच्या विरोधात जाऊन सुगिहारांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा कौल मान्य केला. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठी किंमतही मोजावी लागली.
काय निर्णय घेतला सुगिहारांनी? त्यांनी शरणार्थींना मदत केली का?...
यासाठीच वाचा ही चित्तथरारक सत्यकथा!