Your cart is empty now.
परफेक्शनिस्ट, उत्कृष्ट लीडर, मार्केटिंगची सखोल जाण असणारा, सर्वोत्कृष्ट डिझायनर, जे सर्वोत्तम आहे ते करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारा, डबघाईला आलेल्या कंपनीला नंबर एकची कंपनी बनवणारा, टेक जिनियस... तो म्हणजे, 'अॅपल'चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स. खरंतर स्टीव्ह जॉब्स आपल्यातून निघून गेला त्यालाही आता १३ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण त्याने दिलेल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धड्यांच्या आधारावरच अॅपल ब्रँड आजही आपला क्रमांक एक टिकवून आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयामुळे, त्याच्या सर्वोत्कृष्टतेच्या अट्टाहासामुळे, त्याच्या जीवतोड मेहनतीमुळेच अॅपल ही कंपनी नावारूपास आली आहे. लोकांची अभिरुची जपणारी कंपनी निर्माण करणारा अवलिया तंत्रज्ञान, नावीन्य आणि उत्पादन विकासातील कर्तृत्वामुळे जगावर कायमस्वरूपी प्रभाव अॅपलच्या २१२ वेगवेगळ्या पेटंट्समध्ये 'संशोधक' म्हणून नाव. तंत्रज्ञान उद्योगात एकमेव लाईफस्टाईल कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सर्वोत्कृष्टतेच्या जोरावर ब्रँडनिर्मिती
Added to cart successfully!