Your cart is empty now.
Aacharya आचार्य by Rajiv Patel राजीव पटेल
शंकरच्या कुंडलिनी शक्तीने त्याच्यातील सप्तचक्रांना जाग्रत केलं होतं. प्रत्येक चक्रावर विविध रंगाचं कमळ उमललेलं होतं. प्रत्येक पाकळीवर प्रकाशमान बीजाक्षरं होती. सहस्रार चक्रातलं कमळ शंकरच्या मस्तकाच्या दशांगुळे वर होतं. मधल्या गेंदामध्ये शिव होते. सर्वांत खालच्या थरातील प्रत्येक पाकळीत ब्रह्मदेव होते. त्यावरच्या पाकळी पाकळीवर वसिष्ठ होते. त्यावर वसिष्ठपुत्र शक्ती होते. त्यावर पराशर होते. त्यानंतर व्यास. त्यानंतर शुकाचार्य आणि सर्वांत वरती गौडपादाचार्य होते.
गोविंदपादाचार्य ते अद्भुत दृश्य एकाग्रतेनं बघत होते. सगळ्या कमलदलांमधून प्रकाशाचे कण आणि प्रणवचिह्न उधळली जाऊ लागली. ती सर्व प्रणवचिह्न ध्यानस्थ गोविंदपादाचार्यांच्या देहामध्ये उतरत होती. असाच समय गेला. मग गोविंदपादाचार्यांच्या देहातील चक्रांवर शंकरप्रमाणेच कमळं उमलली. ती सर्व कमळं सुगंधित झाली आणि त्याचा वर्षाव शंकरवर झाला... त्यातून नाद घुमला - "आचार्य... आचार्य... आचार्य... आचार्यऽऽ!"
वैदिक विचारधारेची पताका संपूर्ण भारतभर फडकवत, खऱ्या अर्थाने वैदिक धर्माचे पुनरुत्थान घडवून आणणार्या आद्य शंकराचार्यांचा जीवनपट उलगडणारी, महाकादंबरी..... *"आचार्य"*
Added to cart successfully!