Your cart is empty now.
Jar-Tar chya Goshti Bhag 2 BY Dr. Bal Fondke
कोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. तोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर? प्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा 'जर-तर'च्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते.
Added to cart successfully!