Your cart is empty now.
जीवनात बदल घडवून आणणाऱ्या वाचनीय अशा सहा पुस्तकांचा संच
१) 21 गे्रट लीडर्स किंमत :- २७५/-
21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. पॅटचं इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.’’ -जिम कोजेस आणि बॅरी पॉस्नर (सुप्रसिद्ध लेखक) पुस्तकाची वैशिष्ट्ये- * नेतृत्वाचे सात पैलू * महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये * जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन * 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष * त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग * प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश
२) लवचीकता - आनंदी जीवनाची कला किंमत :- २९५/- जेव्हा गौरांग दास यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापराल तेव्हा निश्चितच तुमचं हृदयपरिवर्तन होईल. तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव मिळेल. यामुळे तुम्ही जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकाल आणि योग्य दिशेने प्रगती करू शकाल. त्यांचं जीवन आणि शिकवणीमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे. आता तीच शिकवण या पुस्तकरूपाने तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. - जय शेट्टी, ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे बेस्टसेलर लेखक तुम्ही अति विचारांच्या गर्तेमध्ये हरवलेले आहात का? कोणता निर्णय घ्यावा, या विचारांनी तुमची झोप उडाली आहे का? जीवन, कामधंदा आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती करून जीवनाला जास्त चांगला अर्थ प्राप्त व्हावा असं तुम्हाला वाटतं का? आईन्स्टाईन एकदा म्हणाले होते की, ज्ञान हे शाळेत जाण्यामुळेच मिळतं असं नाही तर जीवनभर ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी ते प्राप्त होत असतं. तुमची शोधमोहीम या पुस्तकाच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकते. या पुस्तकातील महान कथा आणि त्यामधून घ्यावयाचा बोध याच्या माध्यमातून गौरांग दास हे आपल्याला एका वेगळ्याच यात्रेवर घेऊन जातात. अपेक्षांच्या आणि अस्वीकृतीच्या दर्याखोर्यांमधून पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या खर्या अस्तित्वाची ओळख करून देतात. यामुळे आपल्या हृदयाची दारं खुली होतात आणि आपल्याला खर्या आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव होते. गौरांग दासजी आपल्यामध्ये असलेलं असामान्य सामर्थ्य आणि लपलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतात. - विवेक बिंद्रा, बड़ा बिझनेसचे संस्थापक आणि सीईओ.
३) इकिगाई मराठी दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य किंमत :- २८०/-
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Art of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
* शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. * उत्साही शरीर, उत्साही मन. * तणावाचा फायदा घेण्याची कला. * स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. * लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. * तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.
४) शामनिक पॉवर अॅनिमल्स किंमत :-२८०/- या पुस्तकात, * मनुष्येतर प्राणीबांधवांकडून मिळणारी अद्वितीय ‘प्राणी उपचारपद्धती’ * प्राण्यांकडून शिकवण विचारात घेताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी * आपले शक्तिस्थान आणि दोषही दाखवणारे प्राणी * शामन सामर्थ्याचे प्राणीमात्र * टॉलटेक शामनिक विचारधारा * 64 प्राण्यांकडून 64 कौशल्ये, धडे * प्राण्यांच्या चैतन्यास आव्हान करण्याची पद्धत * प्राण्यांच्या ऊर्जेप्रीत्यर्थ केलेली प्रार्थना * आत्मशक्तीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक * आत्मक्लेशांच्या व्यनाधीनतेतून मुक्ततेचा मार्ग
५) इकिगाई एक सफर मराठी किंमत :- २८०/-
इकिगाई एक सफर’ या पुस्तकामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठीचे 35 प्रभावी मार्ग सांगितले आहेत. या मार्गांचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाचा उद्देश्य पूर्ण करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो.
हे पुस्तक आपल्याला प्रेरणेने आणि उद्देश्याने परिपूर्ण अशा एका नव्या यात्रेवर घेऊन जाते. या यात्रेमध्ये आपल्याला पुढील स्थानकं लागतील. * भविष्याची कल्पना - आपण भविष्यात काय काय साध्य करू शकतो याविषयीचा आशावाद. * भूतकाळातून शिकवण - भूतकाळामध्ये आपण घेतलेल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही निर्णयांमधून आणि अनुभवातून मिळालेली शिकवण. * वर्तमानातील जीवन - प्रत्येक क्षणाला आनंदी जीवन जगण्यासाठी आपण वर्तमानामध्ये काय करायला हवं? * आपल्या अनुभवालाच आपल्या वर्तमानातील आणि भविष्यातील मार्गासाठी दीपस्तंभ कसे बनवावे? * ध्येयनिश्चिती - आपण कशाप्रकारे आपली ध्येयं ठरवू शकतो आणि कोणती साधनं आणि मार्ग आपल्याला ती साध्य करण्यासाठी मदत करतील? The Ikigai Journey या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
६) सवयी घडवतात बिघडवतात चांगल्या सवयी कशा लावाव्यात आणि वाईट सवयी कशा घालवाव्या किंमत :- २५०/-
* सवयींचे प्रकार * सवयीची सुरुवात * ध्येय आणि सवय * सवयींमागील शास्त्रीय कारण * सवय बदलण्याचे हुकमी उपाय * सवयी न बदलण्यामागची कारणे * सवयी विकसित करण्याची पद्धत * प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी * चांगल्या व वाईट सवयी कशा ओळखाव्यात
Added to cart successfully!