Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

thinking-fast-and-slow थिंकिंग, फास्ट ॲन्ड स्लो - डॅनियल कानेमन
Rs. 450.00Rs. 500.00

ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राचे नोबेल विजेते डॅनियल कानेमन आपल्याला मनाच्या अचंबित करणाऱ्या सफरीवर घेऊन जात, आपल्या विचारांना प्रेरित करणाऱ्या दोन प्रणाली समजावून सांगतात. प्रणाली १ ही जलद अंतःप्रेरित आणि भावनिक असून, प्रणाली २ ही संथ, अधिक चर्चात्मक आणि अधिक तार्किक आहे. या दोन प्रणाली आपल्या निवडीला आणि निर्णयाला कसा आकार देतात हे

समजावून घेतल्यावरच आपल्याला पुढील अनेक बाबी लक्षात येतात- कार्पोरेट धोरणांवर अतिआत्मविश्वासाचा होणारा परिणाम, भविष्यात आपल्याला कशामुळे आनंद होईल हे ठरवण्यात येणारी अडचण, स्टॉक मार्केटमध्ये वावरण्यापासून आपल्या पुढच्या सुट्टीच्या नियोजनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आकलनामुळे असलेल्या पूर्वग्रहांचा परिणाम इ. आपण कसा विचार करतो, याबद्दल समजवताना कानेमन वाचकांना संभाषणात गुंतवून ठेवतात. आपल्या अंतःप्रेरणांवर केव्हा विश्वास ठेवायचा, केव्हा नाही आणि शांतपणे विचार करण्याचे लाभ कसे मिळवायचे हे ते उलगडून सांगतात.
आपला व्यवसाय असो की वैयक्तिक जीवन, त्यामध्ये निवड करण्यासाठी ते व्यवहार्य आणि माहितीपूर्ण अंतर्दृष्टी बहाल करतात. त्यायोगे, आपल्याला बऱ्याचदा अडचणीत पाडणाऱ्या मानसिक चुकांपासून स्वतःचं रक्षण करणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर आपण करू शकतो. 'थिंकिंग, फास्ट ॲन्ड स्लो' या पुस्तकाला २०११च्या सर्वोत्तम दहा पुस्तकांमध्ये द न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यूने स्थान दिलं आहे. त्याचप्रमाणे, नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस बेस्ट बुक ॲवॉर्ड व द लॉस एंजेलिस टाइम्स बुक प्राइझदेखील या पुस्तकाने पटकावलेलं आहे. हे पुस्तक किती उत्कृष्ट आहे हे येत्या काळात
लक्षात येईलच.

Categories:
Translation missing: en.general.search.loading