Your cart is empty now.
नंदा खरेंचे उपजीविकेचे साधन / पेशा सिव्हिल इंजिनियरचा असला तरी त्यांचे
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिककारणआणि साहित्यव्यवहार यांतले हस्तक्षेप आणि सहभाग मलाविशेष महत्त्वाचे वाटतात. साधारणत: आपल्या विशिष्टअभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यासविषयसमग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे ही मलात्यांच्याबाबतीतली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याचापरिणाम त्यांच्या आत्ता प्रकाशित होत असलेल्या या लेखनातूनखूप तपशिलाने पाहता येईल. एकारलेल्या शहाणपणापेक्षाजगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करत त्यातले परस्परसंबंधतपासणारे त्यांचे 'कुतूहलमिश्रित भान' मला महत्त्वाचे वाटतआले आहे. खरे तर त्यांचे असे बहुअंगांना स्पर्शणारे व्यक्तिमत्त्वअसल्यामुळेच 'अंताजीची बखर' पासून ललित लेखनातलात्यांचा अन्य प्रवास हा खूपसमृद्ध झाला आहे.त्यांच्या या लेखनात काही जागा माझ्या स्वत:च्या भूमिकेलाछेद देताहेत असेही वाटले. पण त्यांच्या भूमिकेच्यागांभीर्याविषयी, शोषित आणि तळागाळातील माणसांप्रतीअसलेल्या आस्थेविषयी मलाखात्री आहे.-सतीश काळसेकर
Added to cart successfully!