Your cart is empty now.
जेव्हा तुम्ही जॅक रीचरसारखे धिप्पाड आणि राकट असता आणि त्यातच तुम्ही तुमच्या नाकावरच जबरदस्त ठोसा खाल्लेला असतो तेव्हा तुम्हाला लिफ्ट मिळणं जवळजवळ अशक्यच असतं; पण मिळाली, त्यालाही लिफ्ट मिळाली. तीन अनोळखी प्रवासी - दोन पुरुष आणि एक स्त्री ! काही मिनिटातच रीचरच्या लक्षात आलं की, ते तिघंही काहीतरी लपवताहेत, हातोहात खोट बोलताहेत. रस्त्यावर नाकाबंदी केलेली आहे. काहीतरी भयानक घडल आहे आणि पोलीस फरार गुन्हेगारांच्या मागावर आहेत. ते तिघ या नाकाबंदीतून सहीसलामत सुटतील ? त्यांचा त्या गुन्हयाशी काहीच संबंध नाही म्हणून सुटतील? की ते आता चौघ आहेत म्हणून सुटतील? हा रीचार आहे तरी कोण ? गळाला लावलेलं आमिष?
Added to cart successfully!