Your cart is empty now.
सप्टेंबर 2011मध्ये राजू परगई आणि अमित आर्य ह्या दोन गँगस्टरची हत्या झाली. ह्या सनसनाटी घटनेने संपूर्ण उत्तराखंड राज्य ढवळून निघालं. परगईने गुन्हेगारी जगामध्ये अत्यंत वेगाने प्रगती केली होती. शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर तस्करी करण्याच्या इराद्याने निघालेल्या परगईमुळे देशाच्या सुरक्षेला फार मोठा धोका निर्माण झाला असता. त्याला संपवण्याची कामगिरी भारतीय गुप्तहेर संस्थेने ‘एजंट लिमा’ नावाच्या गुप्त मारेकर्यावर सोपवली होती. हत्येनंतर दुसर्या दिवशी लक्ष्मण ‘लकी’ बिश्त - राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो (छडॠ) लकीने एल. के. अडवाणी आणि तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ह्यांचा ‘वैयक्तिक सुरक्षा अधिकारी’ म्हणूनही काम केलं होतं. - ह्याला हल्द्वानी येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्यावर परगई आणि आर्यच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. ह्यानंतर एक गूढ आणि रहस्यमय कहाणी सुरू झाली. एजंट लिमा आणि लकी बिश्त ही एकाच व्यक्तीची दोन रूपं आहेत का? आणि तसं नव्हतं तर सरकारसाठी काम करत असतानाही लकी बिश्त पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ तुरुंगामध्ये का खितपत पडला होता? त्याला सतत वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये का हलवलं गेलं? वारंवार जामीन का नाकारण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून नक्कीच मिळतील.
Added to cart successfully!