Your cart is empty now.
या पुस्तकात सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर सांगतात की, छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्रं सांगतात, ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. या तंत्रांमध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, दोन मिनिटांच्या नियमाची ताकद आणि गोल्डीलॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल तुमचं करिअर, नातेसंबंध आणि जीवन यांत परिवर्तन घडवतील. तुम्ही तुमचा दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता, याविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलणारं असं हे पुस्तक आहे.
Added to cart successfully!