भारतीय संस्कृतीचा एक अभिमानास्पद घटक म्हणून योगशास्त्राला महत्त्व आहे. `आरोग्यासाठी योग` या ग्रंथात महत्त्वाची योगासने आणि योगक्रिया यांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. योगासने नियमित व शास्त्रशुद्ध रीतीने केल्यास आपले आरोग्य निरामय राहते, शरीर कार्यक्षम राहते; आणि व्याधींपासून मुक्तता होते. आपला देह आणि आपले मन यांच्यामध्ये उत्तम संतुलन राहते. योगासनांद्वारे शरीरातील ग्रंथी आणि स्राव यांच्यावर योग्य ते नियंत्रण राहून दीर्घायुष्य लाभते. एका परीने यौगिक क्रिया आणि निसर्गोपचार यांचा उचित मेळ घतला तर शारीरिक तक्रारी वा व्याधी यांना अवसरच मिळणार नाही. शास्त्रशुद्ध योगसाधनेचे रहस्य सुलभपणे उलगडून दाखवणारा हा ग्रंथ तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणेल.