माणसाला होणा-या अधिकतर दुखण्यांचं मूळ मनोकायिक स्वरूपाचं असतं. म्हणजे ती दुखणी आधी मनात सुरू होतात आणि नंतर त्यांचं शारीरिक स्वरूप दिसू लागतं. माणसाची मानसिकता ही तणावामुळे सहज प्रभावित होत असते. राग-संताप हे तणावाचं एक मोठं कारण आहे. म्हणून राग आटोक्यात ठेवण्याच्या, त्याला वाट करून देण्याच्या आणि त्यापलिकडे जाण्याच्या साध्या पण परिणामकारक पद्धतींची ओळख या पुस्तकातून होते. सभोवतालची बदलती परिस्थिती, वाढत्या गरजा, अशा विविध गोष्टींमुळे माणूस वैफल्यग्रस्त होतो, निराश होतो.