`फॅमिली डॉक्टर’, ही संकल्पना काळानुरूप बदलली असली, तरी स्त्री-पुुरुष, आबाल-वृद्ध अशा आपल्या सर्वांनाच आरोग्य विषयक समस्यांसाठी डॉक्टरांची आवश्यकता असते. बालकाच्या विकास-वाढीचा प्रश्न असो, नाक-कान-घसा यांचे विकार असोत. दात, डोळ्यांचे आजार असोत, अथवा आधुनिक सौंदर्यशास्त्र असो, भीतीसारखे मानसिक आजार असोत, अस्थिरोगासारखी जटील समस्या असो. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या असोत, अथवा वैवाहिक समस्या असोत... अर्थात गंभीर समस्या असोत वा किरकोळ आजार, त्याचे वेळीच निराकरण करण्यासाठी मान्यवर डॉक्टरांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन; थोडक्यात `पॅÂमिली डॉक्टर’ ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच... धन्वंतरी घरोघरी!