Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Tumchya Doctor Maitrinishi Hitguj - Bhag 1 'Konala Vicharu Kalatach Nahi' Asha Tumchya Prashnanchi Uttara Ithe Miltil.. - तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज - भाग १
Rs. 224.00Rs. 249.00

Tumchya Doctor Maitrinishi Hitguj - Bhag 1 'Konala Vicharu Kalatach Nahi' Asha Tumchya Prashnanchi Uttara Ithe Miltil.. - तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज - भाग १

वर्षानुवर्षं अंगावर दुखणी काढत खुपत खुरडत जगणाऱ्या भारतीय स्त्रियांमध्ये गेल्या काही वर्षात मोठा बदल झाला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्येही झाला आहे. बायकांच्या दुखण्यांशी आपला काय संबंध असा विचार करून बायकोकडे साफ दुर्लक्ष करणारा नवरा आता अत्यंत काळजीने पत्नीला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन जातो. प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवलेली कन्या आईच्या तब्येतीकडे बारीक लक्ष ठेवून असते. मैत्रिणी एकमेकींना डॉक्टरांकडे घेऊन जाताना दिसतात. भारतीय समाजातला हा बदल खूप सुखावून जातो. अजून एक बदल म्हणजे पूर्वीप्रमाणे डॉक्टरांना तक्रार सांगायची, त्यांनी दिलेली औषधं घ्यायची असं आता पेशंटना फारसं पटत नाही. हा त्रास का होतोय, हा होऊ नये म्हणून काय करता येईल? औषधं नक्की कशी परिणाम करतील? अश्या असंख्य शंका त्यांच्या मनात असतात. या सगळ्या शंका-कुशंकांचे समाधान करता यावे आणि सतत गुगल करणाऱ्या लोकांना शास्त्रशुद्ध माहिती द्यावी हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हा उद्देश साध्य होतोय का हे तुम्ही नक्की कळवाल ही आशा!

Translation missing: en.general.search.loading