‘आई’ या दोनच शब्दांतून मायाळू, बिनशर्त प्रेम करणा-या व्यक्तीची प्रेमळ प्रतिमा उभी राहते, आणि ‘बाबा’ म्हटलं की, संरक्षक, आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवणाNया, शहाणपणाचे धडे देणा-या, अधिक खंबीर अशा व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. पित्याचं प्रेम दृढ आणि विश्वासार्ह असूनही बरेचदा ते तितक्या भावनाशीलतेनं व्यक्त होत नाही, पण ते आई इतवंच उत्कट असतं! फक्त ते बरेचदा शब्दांत मांडलं जात नाही. या पुस्तकात याच नात्याचे गोफ हळूवारपणे उलगडून दाखवणा-या हळव्या कथा आहेत. या कथा वाचकांना त्यांच्या पित्याच्या गाढ प्रेमाची जाणीव देतील आणि त्यांच्या काळजाची तार छेडतील.
.