आत्मिक बळ वाढवणाया या ‘चिकन सूप फॉर द सोल’च्या मालिकेमधला हा सूपचा सहावा कप. सहा कप भरून असलेलं हे चिकन सूपचं भलमोठं वाडगं आता रिकामं होत आलंय, पण त्यामधले पहिले पाच कप सूप पिऊन वाचकांच्या मनाला अपरिमित शांती, समाधानाची अनुभूती लाभली आहे व त्यांचा आशावादही चांगलाच फोफावायला लागलाय, हेही तेवढंच खरं! केवळ सूप पिऊनच खया अर्थानं पोट भरल्याचा, तृप्तीचा व हृदय भारावून गेल्याचा आनंद मिळालाय हेच किती मोठं आश्चर्य! अनंत काळापर्यंत टिकून राहणाया प्रेमाची, शिक्षणाची, कौटुंबिक जिव्हाळ्याची, संकटांवर मात करण्याची शक्ती या सहाव्या कपातल्याही सूपमध्ये दडलेली आहे. या भागातली प्रत्येक कथानकथा तुमचं हृदय हेलावून सोडेल. तुमच्यामधली सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि आयुष्य भरभरून जगण्याची नव्यानं उमेदही देईल. या सहाव्या कपातलं सूप प्राशन करून स्वत:चं सामथ्र्य तर वाढवाच आणि त्याबरोबर आपल्या प्रियजनांनाही याचा आस्वाद देऊन त्यांचंही मनोबल, आशावाद वाढवण्यास मौलिक हातभार लावा.