Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Swami Viveakanandanchi Khari Olakh By Dattaprasad Dabholakar
Rs. 270.00Rs. 300.00

टु किल अ मॉकिंगबर्ड' या पुलित्झर पारितोषिक प्राप्त अभिजात पुस्तकात वर्णन केलेल्या काळानंतर दोन दशकं उलटून गेलेल्या काळावर लिहिलेली ही आणखी एक महत्त्वाची कादंबरी हार्पर ली यांनी सादर केली आहे.

अलाबामातील मेकॉम्ब हे एक छोटसं शहर सव्वीस वर्षांची जीन लुईस फिंच उर्फ 'स्काऊट' ही तिचे वृद्धत्वाकडे झुकू लागलेले वडील अॅटिकस यांना भेटायला न्यू यॉर्क शहरातून मेकॉम्ब इथल्या आपल्या घरी येते. त्या काळात नागरी हक्कांसंबंधीचे ताणतणाव आणि राजकीय गदारोळामुळे अमेरिकेतील दक्षिणी संघराज्यांत परिवर्तन घडत होतं, त्या पार्श्वभूमीभोवती हे कथानक गुंफण्यात आलं आहे. एकमेकांशी घट्ट जुळलेलं आपलं कुटुंब, से छोटंसं शहर. तिथल्या जीवाभावाच्या माणसांबद्दल बेचैन करणारी सत्यं जेव्हा जीन लुईसला समजतात, तेव्हा तिच्या घरी परतण्यामागील भावनांच्या गोडव्यात कटूता कालवली जाते. बालपणीच्या आठवणींचा तर पूरच दाटून येतो आणि मग तिची जीवनमूल्ये आणि गृहीतकेच संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. 'टु किल अ मॉकिंगबर्ड' या कादंबरीतील बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'गो सेट अ वॉचमन या कादंबरीतही आल्या आहेत. भूतकाळातील भ्रामक समजुतींतून बाहेर पडताना जीन लुईसला करावा लागलेला यातनादायी प्रवास तिने सदसद्विवेकबुद्धीच्या बळावर कसा यशस्वीरीत्या पार पाडला, याचा प्रेरणादायी अनुभव ही कादंबरी देते.

१९५१-६० च्या दशकाच्या मध्यावर लिहिलेल्या 'गो सेट अ वॉचमन' या कादंबरीतून हार्पर ली यांच्या विचारांचं अधिक परिपूर्ण आणि समृद्ध आकलन वाचकाना होतंच, शिवाय त्यातील व्यक्तिरेखांच्या जीवनाचा रसास्वादही घेता येतो. अंगभूत शहाणपण, मानवता, उत्कट घ्यास, विनोद आणि सहज साधलेली अचूकता यांनी युक्त अशी ही अविस्मरणीय कादंबरी आहे. मनावर खोल ठसा उमटवणारी ही कलाकती आहे. ती एका वेगळ्याच युगातली कहाणी सांगत असली तरी आजच्या काळालाही ती तेवढीच लागू ठरते. 'टू किल अ मॉकिंग बर्ड' च्या तेज:पुंज शाश्वततेस ती पुष्टी देतेच, त्याशिवाय त्या अभिजात कलाकृतीची पूरक 'सखी' म्हणूनही तिला अधिक खोली, अधिक संदर्भ आणि नवा अर्थ प्रदान करते.

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading