Your cart is empty now.
या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे.अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
Added to cart successfully!