मानव (विश्वनिर्मात्याची र्नििमती) आणि परमेश्वर (विश्वनिर्माता) या दोहोंमधील प्रार्थना हा एकमेव दुवा आहे. प्रार्थना, हेच या दोघांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. देवाकडे कसं जायचं, हे न समजणं ही आपल्यापैकी अनेकांची अडचण आहे. मात्र दादा वासवानींनी तो मार्ग या पुाQस्तकेत फार चांगल्याप्रकारे विशद केला आहे. आता फक्त आपण थोड्या प्रमाणात का होईना प्रार्थना करण्यास पात्र होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी `शिक्षण, पुस्तकी ज्ञान, धनदौलत यांपैकी कशाचीही आवश्यकता नसून आपले अंत:करण ईश्वरासाठी आतूर व व्यावूÂळ असायला हवे.’ दादा वासवानी आपल्याला ईश्वराची प्रार्थना करून आपले जीवन सुंदर बनवण्याचे साधे पण अत्यंत परिणामकारक तंत्र शिकवतात.