Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Conversations With God by Neale Donald Walsch
Rs. 203.00Rs. 225.00
मजा तुम्हाला ईश्वराला मानवी अस्तित्वासंबंधी अत्यंत कोड्यात टाकणारे प्रश्न विचारता आले – प्रश्न, प्रेमाबद्दल आणि श्रद्धेबद्दल, जीवन आणि मृत्यूबद्दल, चांगल्या – वाइटाबद्दल. समजा ईश्वराने त्या प्रश्नांना स्पष्ट, कळतील अशी उत्तरे पुरवली आहेत.
ते नील डोनाल्ड वॉल्शबाबत घडले.
ते तुमच्याबाबतही घडू शकते.
तुम्ही एक संवाद सुरू करणार आहात…
ईश्वराला पत्र लिहून आपल्या व्याकूळतेला वाट करून घेण्याचे वॉल्श यांनी ठरवले तेव्हा ते त्यांच्या जीवनात उतरती कळा अनुभवत होते. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी त्यांना अपेक्षा वाटत नव्हती. त्यांचे पत्र लिहून होताच त्यांच्या हातातून अस्खलित लिखाण लिहिले जाऊ लागले आणि त्यातून त्यांच्या प्रश्नांना ही अनन्यसाधारण उत्तरं मिळाली.
अचूक अर्थ सांगणारी, गहन युक्तिवादाने भारलेली आणि आश्चर्याने थक्क करणारी सत्ये व्यक्त करणाऱ्या या संकीर्ण विरोधाभासी वक्तव्याने तुमची मती गुंग होईल. इथं अशी उत्तरं आहेत जी सगळ्या समजुतींचा आणि परंपरांचा संकलित रूपात गहन अर्थ सांगतात. इथं अशी उत्तरं आहेत जी तुम्हाला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या इतरांकडे पाहण्याच्या दृष्टीला बदलून टाकतील.
खुले मन आणि अपार जिज्ञासा आणि प्रामाणिक इच्छेसह सत्याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक मती गुंग करणारे ठरेल.
Translation missing: en.general.search.loading