Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

DHARMA…KABIRANCHYA MANATALA by OSHO
Rs. 225.00Rs. 250.00
दिव्यज्ञानी कबीरांचे दोहे म्हणजे अध्यात्माचे सखोल चिंतन. ते जेव्हा ओशोंच्या प्रवचनातून प्रवाहित होते तेव्हा कबीरांना अभिप्रेत असलेला अर्थ उमगत जातो. त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म सार ओशो समरसून व्यक्त करतात. म्हणूनच कबीरांची वचनं क्रांतिकारी वाटतात. कारण ती वचनं झणझणीत अंजन आहेत. ज्या हृदयाला ती स्पर्श करतात त्या हृदयातील आत्मज्योत प्रकाशमान होते. मनाचे स्वरूप लक्षात घ्या. ते वारंवार तुमच्या आध्यात्मिक उन्नतीत अडसर निर्माण करतं. मानवी जीवनात श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल मन शंका घेईल, त्या वेळी आत्म्यातील परमात्म्याला पाहता आले पाहिजे. त्याच्यासाठी पाप-पुण्य काहीच नसतं. धर्म व संप्रदायाची चर्चा ओशोंनी पाचव्या प्रवचनात केली आहे. ज्यांना धर्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी सर्व धारणा व भेदांपासून अलिप्त व्हायला पाहिजे,हे ओशो आपल्या प्रवचनांतून सांगत आहेत.
Translation missing: en.general.search.loading