Your cart is empty now.
Punarjanma (पुनर्जन्म)
समाधीमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील परिस्थिती प्रसिध्द करून ठेवली ती नंतर अंतराळ्यानांनी अचुक असल्याचे दाखवल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले... दिव्यदृष्टी असलेले आधुनिक साक्षात्कारी संत. प्राचीन विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" - या पहिल्याच ग्रंथात आव्हानत्मक रीतीने भीमाचे नायकत्व सिध्द करून महाभारतीय घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने निश्चित ठरवणारे. "वास्तव रामायण" या ग्रंथात भारताचा पंधरा हजार वर्षांचा इतिहास साकारणारे व रामायणाच्या तारखा खगोल शास्त्राधारे निश्र्चित करणारे. "उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण" - या स्वानुभवपूर्ण ग्रंथाने आध्यात्मिक अधिकार सिध्द करून आधुनिक ऋषी अशी मान्यता पावलेले. "पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरुपण" या अनुभूतिपूर्ण संशोधनात्मक ग्रंथाने योगशास्त्रावरील प्रभुत्व सिध्द करणारे. "गीता - विज्ञाननिष्ठ निरुपण" या ग्रंथामुळे गीतेच्या भाष्यकारांमध्ये स्थान मिळालेले. "ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा"- या आत्मचरित्राने लोकांच्या हृदयात स्थान मिळविलेले. ब्रम्हर्षि व समाजभूषण या पदव्या देऊन समाजाने गौरविलेले, डॉ. प. वि. वर्तक यांच्या दिव्य लेखणीतून उतरलेला अव्दितीय ग्रंथ पुनर्जन्म.
Added to cart successfully!