नावावरूनच कळते की, ही सामर्थ्यशाली रघुकुळाची काव्यमय कथा आहे. रामाच्या पूर्वजांचे वर्णन यात आहे. यात १९ सर्ग किंवा प्रकरणे आहेत. राजा दिलीपाच्या (….) कथेने याचा प्रारंभ होतो. गुणांची मदद करणारा, निस्वार्थी आणि नम्र असा हा राजा दृष्कृत्यांचे पारीपत्य करणारा होता. या महाकाव्यात कालीदासाने त्याच्या अद्वितीय उपमा अलंकाराची अनेक ठिकाणी भर घातलेली आहे.