Your cart is empty now.
श्रीमहाभारत श्रीराम कृ. बोरकर
'श्रीमहाभारत' हा संशोधनपर ग्रंथ म्हणजे ज्येष्ठ लेखक समीक्षक श्रीराम कृ. बोरकरांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा एक चिरस्थायी ठेवाच होय!
अनेक मूलगामी विषयांचा सखोल व्यासंग, मूलग्राही अभ्यासू दृष्टी, चौफेर वाचन आणि आशयगर्भ प्रवाही अशी ललित मधुर भाषाशैली ही बोरकरांची बहुविध गुणवैशिष्ट्ये 'श्रीमहाभारत' ग्रंथातून प्रकर्षाने प्रगट होतात.
'श्रीमहाभारत' हा ग्रंथ स्थलकालातीत स्वरुपाचा चिरंतन व चिरनूतन असा आपल्या संस्कृतीचा एक बहुमोल वारसा ठरला आहे. मानवी जीवनसंघर्षाचे आणि मानवी स्वभावातील बऱ्यावाईट गुणदोषांचे त्यातले दर्शन, वाचकांना शाश्वत स्वरुपाची शिकवण देते.
'व्यास क्रिएशन्स' या दर्जेदार प्रकाशन संस्थेने बोरकर यांच्या लेखनाचं स्वागत केलं आहे. उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट यांचा सुंदर गोफ म्हणजे हे पुस्तक होय. जुन्या-जाणत्या, आजच्या पिढीने हे पुस्तक आवर्जून वाचावं. हा अनमोल ठेवा आहे परंपरेचा... आणि तुमच्या-आमच्या अभिमानाचा!
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!