Your cart is empty now.
गीता ज्ञान रहस्य
गीता एक असा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो शतकानुशतके केवळ सांसारिक लोकांच्याच नव्हे तर तत्त्ववेत्यांच्याही आकर्षणाचं केंद्र राहिला आहे. गीतेला वेळोवेळी विश्वातील निरनिराळ्या तत्त्ववेत्यांनी, रचनाकारांनी आपल्या भाषेत, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या समजेनुसार पुनःपुन्हा प्रस्तुत केलं. असाच एक प्रयत्न तेजज्ञान फाउंडेशननेही केला आहे. प्रस्तुत गीतेमध्ये श्रीकृष्णाची वाणी तेजज्ञानाच्या प्रकाशात सादर केली. ज्यायोगे त्यामागे दडलेली सार्थक समज सहजतेनं वाचकापर्यंत पोहोचावी.
गीता केवळ अर्जुनाचा संशयच दूर करत नाही तर ती प्रत्येक मनुष्याला मार्ग दाखवते, जो दररोज कोणत्या न कोणत्या समस्येरूपी युद्धात घेरलेला असतो, त्यासाठी ही एक अशी युक्ती आहे, ज्यामुळे त्याचे संघर्ष खेळ बनतील. तसंच आपल्या जबाबदार्या केवळ सहजतेने पूर्णच होणार नाहीत तर त्या आनंद आणि मुक्तीचं कारणदेखील बनतील. मग आपल्या कोणत्याही समस्येचं निराकरण शोधण्यासाठी अन्यत्र कुठेही जाण्याची आवश्यकताच भासणार नाही. गीतेतचं सर्व उत्तरं गवसतील. चला, यातच जीवनाच्या 18 युक्ती आपण जाणू या.
* संभ्रमा (द्विधा)साठी युक्ती * परमशांती युक्ती * कायमस्वरूपी उपाय प्राप्त करण्याची युक्ती * लाचारी (अविश्वास)साठी युक्ती * पूर्ण योगी युक्ती * सत् चित मन युक्ती
(डउच) * अज्ञान दूर करण्याची युक्ती * सद्गती युक्ती * असामान्य समर्पण युक्ती
* उपासना युक्ती * अहम् ब्रह्मास्मि युक्ती * ईश्वराचा प्रिय बनण्याची युक्ती (ऊशरी ेष ॠेव) * यथार्थ जीवन जगण्याची युक्ती * आळसातून मुक्त होण्याची युक्ती * उत्तम
पुरुषोत्तम युक्ती * शास्त्र अनुकूल कर्म युक्ती * श्रद्धायुक्त युक्ती * अंतिम युक्ती – शुभक्ति
गीता असा सुकाणू आहे, ज्याआधारे अर्जुनाची जीवनरूपी नाव कर्तव्यबोध आणि स्वबोध या दोन किनार्यांवर एकाचवेळी थांबली. आज तेच सुकाणू तुम्हाला मिळत आहे. आपल्या जीवनाचा प्रवास जर या सुकाणूंच्या आधारे पार पाडला तर नेहमी मुक्त आणि आनंदी राहाल.
Added to cart successfully!