Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

JANMOJANMINCHE BODHA AANI MEMORY HEALING
Rs. 176.00Rs. 195.00

स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार

 

मनुष्य खरंतर आपले बोध शिकण्यासाठी, निसर्गाचा विकास-तेजविकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. पण चारही दिशांकडून येणार्‍या नकारात्मक तरंगांनी त्याला जडत्व येतं. त्याच्या स्मृतींमध्ये दबलेल्या जखमी आठवणी त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. परिणामी तो त्याचं जीवन सार्थक बनवू शकत नाही.

 

या बाह्य कारणांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता आपण थांबवू शकतो का? नाही ना! मग आपण असं काय करायला हवं, ज्यामुळे आपल्याला जीवन ओझं न वाटता, बाधा असल्या तरी हलकं-फुलकं राहून आनंदाने उड्डाण भरता येईल… इतरांमध्ये मंगल इच्छा जागृत करून, जीवनाचं सार्थक करता येईल! यावर उपाय आहे – कटू स्मृतींवर उपचार करून जीवनाचा उपचार… पण कसं? हे पुस्तक म्हणजे त्याचं उत्तर आहे!

 

यामध्ये तुम्हाला निसर्गाची प्रेममय कार्ययंत्रणा समजेल. शिवाय निसर्गाच्या कृतीयोजनेची सखोल रहस्यं तुमच्यासमोर उलगडतील. ती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जीवनात जे काही करायला आला आहात, तेच कराल. पुस्तकातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत –

 

शरीरावर, मनावर ओझं लादण्याची चार मुख्य कारणं

कार्मिक बंधनं मिटवण्याच्या प्रभावशाली पद्धती

आयुष्यातील कटू अनुभवांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि ते नष्ट करण्याचं महत्त्व

जखमी स्मृतींना बरे करण्याचे उपाय- सार्थक सबक

सार्थक सबक शिकण्यासाठी निसर्गाद्वारे केलेली विशेष व्यवस्था- लोक, घटना, परिस्थिती…

चला तर, पुस्तक उघडून जखमी स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार नियम जाणू या, आपले सार्थक बोध शिकू या!

Categories:
Translation missing: en.general.search.loading