Your cart is empty now.
मौन नियम
स्वतःला जाणण्याचा निःशब्द उपाय
सर्वोच्च यशाच्या पुढे कोणती अवस्था आहे
* मोठा माणूस बनणे ही आपली सर्वोच्च अवस्था आहे का?
* प्रत्येक ठिकाणी प्रथम येणे, ही आपली सर्वोच्च अवस्था आहे का?
* जीवनात सर्व क्षेत्रांत यश संपादन करणे ही सर्वोच्च अवस्था आहे का?
* आपल्या सर्व स्वप्नांची पूर्ती होणं ही सर्वोच्च अवस्था आहे का?
निश्चितच नाही!
या सगळ्या गोष्टी तर आपोआपच आपल्या आयुष्यात येतील, जेव्हा आपण सर्वोच्च अवस्था प्राप्त कराल! पण ही अवस्था म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? याचं आकलन होण्यासाठी आपल्याला थोडं थांबून थांबून हा प्रवास करावा लागेल. या निःशब्द यात्रेत प्रस्तुत पुस्तक आपलं मार्गदर्शक बनेल.
मौन म्हणजे शांत बसणे असं नसून आध्यात्मिक मौनाविषयी येथे सांगितलं जात आहे. हे पुस्तक माया ते मौनाची, नकली आनंद ते खरा आनंद, निम्न अवस्था ते सर्वोच्च अवस्था… असा प्रवास आहे.
चला, स्वतःला जाणण्याच्या अंतिम मार्गावर या शुभ यात्रेचा परिणाम प्राप्त करू या…
Added to cart successfully!