Your cart is empty now.
ईश्वरीय स्पर्श
आपल्याकडे असं एक पेन आहे, ज्याने एखादा शब्द जरी चुकीचा लिहिला गेला, तरी त्याच्यात लगेच लाल दिवा प्रज्वलित होतो. अट फक्त इतकीच, की लिहायला आरंभ करण्यापूर्वी आपण त्यात असलेल्या बटनाला स्पर्श करायला हवा. कारण तसं केलं तरच आपल्याला मार्गदर्शन मिळतं, अन्यथा नाही. परंतु आपल्याला पेनाचं हे वैशिष्ट्यच माहीत नसल्याने आपण आयुष्यभर त्याच पेनाने लिहित राहतो… शाब्दिक चुका करत राहतो… पण शेवटपर्यंत आपल्याला पेनात ही सुविधादेखील उपलब्ध होती, हे जाणत नाही. एवढी मोठी चूक आपल्या हातून कशी घडली बरं!
होय, आयुष्यभर आपण या शरीररूपी पेनाचा उपयोग करत राहतो. परंतु आयुष्यात आपण नेमके कुठे चुकतोय, अयोग्य दिशेला कसं भरकटतोय, याची जाणीव आपल्याला होत नाही. जेणेकरून आपण कितीतरी दुःख भोगतो. असह्य वेदना, यातना सहन करतो…! मात्र आपण जर आपल्यातील ‘स्व’ला स्पर्श केला, तर या सर्व गोष्टीतून त्वरित मुक्त होऊ शकतो. उशिराने आलेला समंजसपणाही काही कमी नाही…!
प्रस्तुत पुस्तकात मानवी शरीरातील हेच वैशिष्ट्यपूर्ण रहस्य आपल्यासमोर उलगडलं जात आहे. ज्यात आपण समजू शकाल,
* आपण कोण आहोत? श्रीकृष्ण कोण आहेत? ईश्वरी परमसत्तेची महानता काय आहे?
* आपलं शरीर, आपलं रूप, गुण, अभिव्यक्ती, भावना, हे सगळं नेमकं काय आहे?
* विश्वरूपदर्शनाचा खरा अर्थ काय?
* आंतरिक समाधिवस्थेत प्रवेश कसा करावा?
* ध्यानरूपी बटनाद्वारे ‘ईश्वरीय’ स्पर्श कसा अनुभवावा?
Added to cart successfully!