Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

GITA SERIES – ADHYAY 1&2: DNYAN-VIDNYAN GITA LEELA-GITECHA ADBHUT SANGAM AANI PRARAMBH
Rs. 158.00Rs. 175.00

ज्ञान-विज्ञान गीता – लीला गीतेचा अद्भुत संगम आणि प्रारंभ

 

मानसिक द्विधावस्थेतून मुक्तीसाठी- महान गीता

 

‘काय करू आणि काय नको…’ या संभ्रमात असलेला अर्जुन ज्यावेळी मोहपाशात अडकलेला होता, त्यावेळी त्याला गीतेच्या रूपात परमज्ञान मिळालं. त्यानंतर तो केवळ जगाच्या या लीलेतच जिंकला असं नव्हे, तर मानवी जीवनाचं अंतिम लक्ष्यदेखील त्याला गवसलं.

 

आपणही आजचे अर्जुन असून, आपल्यालाही दररोज कोणत्यातरी समस्येला सामोरं जावं लागतंच. परंतु या लीलेत दडलेल्या गीतेत आपल्याला अशी समज प्राप्त होते, जी योग्य वेळी सुयोग्य दिशा दर्शवते. आवश्यकता आहे केवळ ज्ञानाच्या या महासागरात मननरूपी रवी फिरवून त्यातून आपली गीता प्राप्त करण्याची! प्रस्तुत पुस्तकात आपण अत्युच्च प्रेम, आनंद आणि शांतीयुक्त जीवन जगण्याची कला शिकणार आहोत…

 

* आयुष्यातील समस्यांकडे (युद्धाकडे) कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल?

* संभ्रमित अवस्थेत योग्य निर्णय कसे घ्याल?

* सुयोग्य निर्णय घेताना मनाच्या ज्या सवयी बाधा बनतात, त्या दूर कशा कराल?

* तणावाशिवाय आपली योग्य कर्तव्यं कशी कराल?

* कर्मं आणि अकर्मं योग्य पद्धतीने कशी कराल?

* कर्माद्वारे जी बंधनं बनतात, त्यांतून मुक्त कसे व्हाल?

* जगात सर्व कर्तव्यं करत असताना सुखी, शांत आणि आनंदी जीवन जगून ईश्वराला प्राप्त कसं करालं?

* मृत्यू म्हणजे काय? मरणोत्तरही जीवन असतं का?

 

वाचकहो, आपल्या अंतर्यामी असलेला कृष्ण तुम्हाला गीता सांगण्यासाठी सदैव तत्पर असतो, साद घालत असतो. मात्र त्याला प्रतीक्षा असते केवळ आपण अर्जुन बनण्याची! चला तर, या ग्रंथाचे पहिले दोन अध्याय, जे आपली आतुरतेने वाट पाहात आहेत, ते वाचायला आरंभ करू या…

Categories:
Translation missing: en.general.search.loading