ध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक दार आहे. ध्यान केवळ आध्यात्मिक पातळीवरच न राहता, त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, हे ओशोंनी अनेक दाखले देऊन समजावले आहे. मनाच्या पलीकडे जाऊन ध्यान काय आहे, हे ओशोच सांगू जाणे. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. ध्यानामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि तो अधिकाधिक विधायक होत जातो. ध्यान ही कल्पना धर्मातीत आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनातही धर्माचे स्थान काय आहे, हेही त्यांनी सांगितले आहे. ध्यान मनुष्याला अंतर्बाह्य बदलवते, हे ओशोंनी संभाषणाच्या खास शैलीतून व्यक्त केले आहे. आध्यात्मिक क्षेत्राबद्दल सामान्य माणसाच्या मनात निर्माण होणाया प्रातिनिधिक प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्याला या पुस्तकातून निश्चितच मिळतात.