Your cart is empty now.
गणित हा विषय शाळेतल्या भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासावर आधारलेला असतो. गणिताच्या अभ्यासात मागचा कुठलाही भाग कच्चा राहिला तर पुढचं सर्वच गणित कठीण होऊन बसतं.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणितातील सर्व अभ्यासक्रम सोपा करून मांडला आहे. या चार पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हा विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास वाटतो.
शालेय गणिताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालकांना व शिक्षकांनाही ही पुस्तके उपयुक्त ठरतील.
गणितातील सर्व संकल्पना समजून घेण्यासाठी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनाही या पुस्तकांचा उपयोग होईल.
Added to cart successfully!