शालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.
गणित हा विषय शाळेतल्या भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासावर आधारलेला असतो. गणिताच्या अभ्यासात मागचा कुठलाही भाग कच्चा राहिला तर पुढचं सर्वच गणित कठीण होऊन बसतं.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणितातील सर्व अभ्यासक्रम सोपा करून मांडला आहे. या चार पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हा विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास वाटतो.
या पहिल्या भागात पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी, पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार, साधी समीकरणे, समीकरणांवरील प्रश्न, घातांक, बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी, बैजिक राशींचा गुणाकार व भागाकार, विस्तार, अवयव, बैजिक राशींचे पृथक्करण या पाठांचा समावेश केला आहे.
शालेय गणिताचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांबरोबरच, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालक-शिक्षकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.