एका स्वप्नाळू मुलाची आणि लाल पतंगाची गोष्ट.
हरीने हळूच एक डोळा उघडला आणि पाहिलं. आजोबांच्या हातात होता एक मोठ्ठा पतंग! लालभडक रंगाचा. त्याची शेपटी निळीभोर होती. आणि लाल रंगावर वरच्या बाजूला दोन काळे गोल चिकटवलेले होते. ते पतंगाचे डोळेच वाटत होते! असा डोळेवाला पतंग हरीने कधीच पहिला नव्हता. शिवाय नेहमीपेक्षा याचा कागद वेगळाच होता, आणि आकार खूप मोठ्ठा.
"आजोबा! तुमच्याकडे कुठून आला इतका छान पतंग?"
मग तो हळू आवाजात म्हणाला, "पण मी कसा पतंग उडवणार आजोबा? त्यासाठी मला थोडंतरी चालावं-पळावं लागेल..."