Your cart is empty now.
मोहन एकदा वाण्याकडे सामान घ्यायला जातो. घाईगडबडीत वाणीदादा त्याला पन्नास रुपये जास्त देतो. मोहनला ही गोष्ट कळते खरी पण ती आईला न सांगता ती नोट आपल्या खिशातच ठेवतो. त्यानंतर मात्र दिवसभर त्याला ही गोष्ट खटकत राहते. तो अस्वस्थ होतो. आपण चोर आहोत असं त्याला वाटू लागतं. शेवटी तो धीराने निर्णय घेतो आणि आईला आपली चूक कबूल करतो... या गोष्टीतल्यासारखे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात किंवा घडून गेलेले असतात. अशा वेळी आपला मुलगा चुकीच्या मार्गाला लागू नये यासाठी त्याला या गोष्टी प्रेरक आहेत.
स्वतःचाच शोध घ्यायला प्रवृत्त करणार्या या गोष्टी शिक्षकांनी, मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून वाचाव्यात.
Added to cart successfully!