कुठल्याही गृहिणीची ओळख ही तिच्या घरावरून होत असते. ती स्वयंपाकात सुगरण असते, एवढेच नव्हे तर घरातील वेगवेगळ्या विभागात जसे स्वयंपाकघर, मुलांची देखरेख, शाळा व त्यांचा अभ्यास, आरोग्य, मोठ्यांची सेवा, एखाद्या कार्यक्रमांची अवस्था इत्यादी जबाबदार्यांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते. कुटुंबातील व्यक्तींसाठी स्वयंपाकापासून ते आरोग्यापर्यंतची सर्व कामे मुख्यत: तीच सांभाळत असते. आपल्या सुखी कुटुंबाची सुरक्षितता तिच्याच हाती असते. म्हणून कुटुंबात तिचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.
अशा या आदर्श गृहिणीला आपले घर सुखी, संपन्न व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नेहमीच दक्ष राहावे लागते. तिच्या कामात सुनियोजितपणा आणि नीटनेटकेपणा आणण्यासाठी साध्या; पण अत्यंत परिणामकारक टिप्स या पुस्तकात आहेत.
कुटुंब व नोकरी या दोन्हीही जबाबदार्या अगदी सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी प्रत्येक गृहिणीला या पुस्तकाचा नक्कीच फायदा होईल. कोणत्याही कामात कार्यकुशलता येण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच तत्त्व लक्षात घेऊन घरातील प्रत्येक विभागात गृहिणीला उपयुक्त ठरणार्या अनेक टिप्स या पुस्तकात देण्यात आलेल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक गृहिणी आपल्या कुटुंबातील सर्वांचं मन जिंकून कौतुकास पात्र ठरू शकेल आणि एक चांगली गृहिणी बनू शकेल.