समकालीन कुटुंबजीवनाचा आरसपानी आरसा!
वरकरणी मोहक वाटणारी मुक्त अर्थव्यवस्था धोक्यात हरवणाऱ्या वाटा निर्माण करेल, हे सुरवातीला जाणवलं नाही. आज त्यातले धोके लक्षात येत आहेत. या बाबतीत मंगला गोडबोलेंनी वेधक शैलीत केलेलं भाष्य आपल्याला जागृत करू शकेल. लोकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांनी दाखवलेल्या या आरशात वारंवार डोकावून पहायला हवं.