भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले' हा ग्रंथ म्हणजे केवळ जोतीराव फुले यांचे चरित्र नसून त्यांच्या सामाजिक चळवळीचा इतिहास आहे, त्यांच्या लेखनामागील तळमळीचे मर्म तो सांगतो. सामाजिक सुधारणा व सामाजिक क्रांती यांचा मूलगामी शोध घेत भारतीय समाजक्रांतीचे स्वरूप लेखकद्वयांनी येथे स्पष्ट केले आहे. समता, न्याय व बंधुभाव ही मूल्ये भारतीय जनमानसात रुजावी हे म. फुले यांचे अंतिम स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नाचे मूलगामी विवेचन या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले यांच्या अभ्यासकांना, तसेच त्यांचे जीवन व कार्य समजून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.