Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Garudzep By Ranjeet Desai
Rs. 99.00Rs. 110.00
‘चांदण्यात’ हा श्री. वि. स. खांडेकरांचा दुसरा लघुनिबंध संग्रह. त्यांच्या या पुस्तकाविषयी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी म्हणतात : ‘खांडेकरांच्या’ लघुनिबंधाचे स्वरुप काहीसे कठीण पृष्ठभागावर उच्छृंखलपणे उड्या मारीत जाणाऱ्या रबरी चेंडूसारखे आहे. ‘एवादे लहान मूल एखाद्या सुंदर बगीच्यात सोडावे, या ताटव्यावरुन त्या ताटव्याकडे त्याने हर्षभरित अंत:करणाने बागडत बागडत हिंडावे, फुलांचे नयनमनोहर रंग, फुलपाखरांच्या रंगेल भराऱ्या, थुईथुई बागडणारे कारंज्यांचे तुषार, गोड लुसलुशीत हिरवळ या सगळयांनी त्याला भुरळ पाडावी आणि भटकत भटकत त्याने आपल्या निवासस्थानापासून लांबवर जावे. मग चुकून मागे वळून पाहताच त्याला आपण जेथून निघालो, ते ठिकाण दिसण्याऐवजी जर जिकडे तिकडे फुले, पाने आणि फुलपाखरेच दिसली, तर त्यात काय नवल ? ‘कल्पनांच्या कोलांटउड्या खात खात खांडेकरांची लेखणी इकडून तिकडे बागडू लागली, की तिला भुई थोडी होते. या कोलांटउड्यांत मधूनच सुविचारांचे धक्के वाचकांना बसतात. ममतेचा ओलावा त्यांच्या अंगाला लागतो. ‘लघुनिबंध हा एखाद्या झऱ्यासारखा असावा. एखाद्या खडकातून तो अचानकपणे उगम पावतो. वाट फुटेल, तसा तो धावत जातो. मार्गात एखादी नदी किंवा मोठा ओहोळ भेटला, तर त्यांना तो मिळतो किंवा पाणी आटल्यामुळे अधेमधेच जिरुन जातो. असेच का नसावे ? ‘कल्पना आणि विचारशक्तीचा उच्छृंखल विलास, असेच मी खांडेकरांच्या लघुनिबंधाचे वर्णन करतो.’
Translation missing: en.general.search.loading